पोलिसांनी मोठा दहशदवादी कट उघडकीला आणला; 4 दहशतवाद्यांना अटक

चंडीगड – हरियाणा पोलिसांनी ( Haryana Police ) काल एक मोठा दहशदवादी कट उघडकीला आणला ( The big terrorist plot was exposed ) असून, पाकिस्तानशी संबंधित 4 दहशतवाद्यांना कर्नाल ( Karnal ) जिल्ह्यातून अटक केली आहे. ते प्रवास करत असलेल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र ( Weapons), दारुगोळा ( Ammunition ) आणि स्फोटकं ( Explosives ) जप्त करण्यात आली असल्याची माहिती हरियाणाचे मंत्री अनिल वीज ( Minister Anil Vij ) यांनी दिली.

पाकिस्तानातील खलिस्तानवादी दहशतवादी हर्जिंदसिंग रिंढा ( Harjind Singh Rindha, a Khalistani terrorist from Pakistan ) हा ड्रोन द्वारे पंजाबमधील फिरोजपुर जिल्ह्यात ( Ferozepur district in Punjab ) शस्त्रात्र, दारुगोळा पाठवत होता आणि हे चार दहशतवादी ही सर्व शस्त्रास्त्र घेऊन तेलंगणा ( Telangana ) राज्यातील आदिलाबाद ( Adilabad ) इथ पोहचवण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी ही कारवाई केल्याचं अनिल वीज यांनी सांगितलं.