S. Jaishankar | एस. जयशंकर यांच्या हस्ते शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन

पुणे S. Jaishankar : शाकाहार पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल लिखित ‘सुखी जीवन का आधार : शाकाहार’ या शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्या हस्ते हुबळी (कर्नाटक) येथे झाले. परराष्ट्र मंत्रालयाकडून दिले जाणारे शाहीभोजन शाकाहारी असावे, असे आवाहन डॉ. कल्याण गंगवाल यांनी डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar)  यांना केले. जयशंकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील काळात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कर्नाटकातील वरुर येथील श्री नवग्रह तीर्थक्षेत्र येथे जैन एजीएम आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांच्या सानिध्यात हा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रसंगी परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आमदार एम. आर. पाटील, विश्वेश्वरैय्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “पुस्तक प्रकाशनासोबतच कर्नाटक राज्यात शाकाहाराचा प्रसार गतिमान होईल. लहान वयातच शाकाहाराविषयी मुलांना माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यामध्ये अनेक चित्रे, आकृत्या, कार्टून्सच्या माध्यमातून रंजकपणे शाकाहाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal