युपीत आता रोडरोमिओंची खैर नाही; पोलिस करणार थेट एन्काऊंटर ?

कानपूर – एखाद्या गुंडाने चौकात माता-भगिनींची छेड काढली तर, दुसर्‍या चौकात पोहोचेपर्यंत पोलिस त्याला यमसदनी पाठवतील, असा निर्वाणीचा इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रोडरोमिओंना दिला आहे. ते कानपूरमध्ये व्हीएसएसडी कॉलेज मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

योगी म्हणाले, एखादा गुंड एका चौकात माता-भगिनींची छेड काढतो. दुसर्‍या चौकात दरोडा टाकण्याचे धाडस करतो, पण आता असे होणार नाही. कारण, सीसीटीव्ही कॅमेर्‍यात त्याची प्रत्येक हालचाल कैद होईल. त्यामुळे यापुढे कोणी एका चौकात छेड काढली िंकवा दरोडा टाकला तर, पुढच्या चौकात पळून जाण्यापूर्वीच पोलिस त्याला ठार करतील.