Shivajirao Adhalarao Patil | शिवाजीदादांच्या प्रचाराला वेग, हडपसर विधानसभा क्षेत्रातील नेते, पदाधिकारी आणि मतदारांच्या घेतल्या भेटी

लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी प्रचाराला वेग आणला आहे. गावभेटींनंतर आता आढळराव पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आढळराव पाटील यांनी हडपसर विधानसभा क्षेत्रात  मतदारांच्या भेटीगाठी घेत, महायुतीच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या कार्यालयाला भेटी दिल्या.

आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मुंढवा पुणे येथे मा. नगरसेवक प्रशांत म्हस्के यांच्या निवासस्थानी, उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या कन्या नगरसेविका हिमालीताई कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयास व उपमहापौर नवनाथ कांबळे संस्थापक स्वप्निल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भेट दिली. बीटी कवडे रोड, प्रभाग क्रमांक २१ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधना बँक चेअरमन चंद्रकांत नारायण कवडे व मा. नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कौसरबाग कोंढवा अरेबियन बाईट्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

या प्रसंगी, हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, मा. आमदार योगेश टिळेकर, पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद  भानगिरे, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, मनसे नेते बाबू वागस्कर, नगरसेविका नंदा लोणकर, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, भाजप सरचिटणीस गणेश घुले, मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, हडपसर कार्याध्यक्षा स्मिता दातीर बडदे, ओबीसी सेल हडपसर अध्यक्षा मोनिकाताई काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संजय लोणकर, मयुवक अध्यक्ष राकेश कामठे, वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मोहन क्षिरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला