Bharat Gogavale | तुम्हाला तटकरेंसारखा सुशिक्षित खासदार हवा की अनंत गीतेंसारखा निष्क्रिय माणूस हवा

Bharat Gogavale | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराने वेग धरला आहे. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शिवसेना मुक्य प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी विरोधी उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र सोडले.

या विभागाने शिवसेनेवर जितके प्रेम केले आहे तितके प्रेम कुणावर केले नाही. कुठल्या समाजाने घाबरण्याचे कारण नाही. महायुतीच्या नेत्यांनी तुमचा विकास करायचा ठरवला आहे. ११२ कोटी रुपये महाड मतदारसंघात निधी आणला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला तटकरेसाहेबांसारखा सुशिक्षित खासदार हवा की अनंत गीतेंसारखा निष्क्रिय माणूस हवा असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला.

यावेळी मतदारसंघात आणलेल्या निधीचे वाचन आमदार भरत गोगावले यांनी यावेळी केले. एकही गाव एकही वस्ती या निधीतून वगळली नाही आणि त्यातून राहिली असेल तर ही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच करुन देतो असा शब्द देतानाच घड्याळ या निशाणीवर बटण दाबून सुनिल तटकरे यांना निवडून द्यायचे आहे असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केले.

गोरगरीबांना माता भगिनींना, मुलींना मदत करणारे हे महायुतीचे सरकार आहे. मात्र काहीजण निवडणुकीच्या काळात जातीचे राजकारण करत आहेत अशा लोकांच्या नावाने एक नारळ बाजुला काढून ठेवा. तुमच्यासाठी आम्ही खूप केले पण तुम्ही आमच्यासाठी काही केले नाही आता इकडे फिरकू नका असे ठणकावून अनंत गीते यांना सांगा असेही भरत गोगावले यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा