सत्ता येते आणि जाते पण सहकार संस्थाही नीट चालवली पाहिजे- Sharad Pawar

Sharad Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन शरद पवार साहेब यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला राज्यातील इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी देशातील चुकीच्या प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार साहेब यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व रायगड जिल्हा बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोहळा हा खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अनेक मान्यवरांकडून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम झाल्याचे शरद पवार साहेब म्हणाले. यावेळी बोलत असताना पवार साहेबांनी सहकारी संस्था मजबूत करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, कोल्हापूर बँक या अशा काही बँका आहे, त्यांचा आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आज राज्यात सहकारी क्षेत्रात अनेक बदल होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी उत्तमरित्या काम केलं आहे. आमदार जयंत पाटील हे संचालक आहेत. आणि त्यांच्यामुळे परिसरात वसुली वेळेवर होते. तुम्ही लोकांनीही वेळेवर बँकेचे पैसे भरले पाहिजे, असा सल्लाही शरद पवार साहेबांनी उपस्थितांना दिला. सत्ता येते आणि जाते, पण सहकारी संस्थाही नीट चालवली पाहिजे. आणि इथे सरकार नीट चालवण्यासाठी चांगली लोक बसली पाहिजे. व्यक्तिगत राग असू शकतो पण त्याचा विचार न करता संस्थेसाठी काम केलं पाहिजे. जिल्ह्यासाठी चांगलं काम करण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.

आज बॅरिस्ट अंतुले यांनी या जिल्ह्याचं नेतृत्त्व केलं. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अंतुले यांच्यासोबत संपूर्ण जिल्ह्यात फिरलो होतो. पण अंतुले हे शेवटच्या माणसापर्यंत नाव लक्षात ठेवणारे नेते होते. आम्ही अनेक वेळा सोबत काम केलं ते मुख्यमंत्री होते, मी विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेक वेळा संघर्षाचे प्रसंग आले होते. अंतुले साहेब देशाचा विचार करणार नेता होता आणि तो नेता रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आला होता. त्यांनी सामान्य कुटुंबातील लोकांना विश्वास देऊन जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याचा काय विचार केला.आज समाजामध्ये जातीय तिढा कसा निर्माण होईल याचा कार्यक्रम करणार नाही, पण काही घटक आहेत. आज देशाला दिशा देण्याची ताकद महाराष्ट्रमध्ये आहे, असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित