दूरदर्शनचा भारदस्त आवाज काळाच्या पडद्याआड! प्रदीप भिडे यांचं निधन

मुंबई – दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. (Senior news correspondent Pradip Bhide dies in Mumbai after a long illness) मुंबई दूरदर्शन केंद्रावरून (Mumbai Doordarshan Kendra) म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून (sahyadri) गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते ६४ वर्षांचे होते.

विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून (Ranade Institute) पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.

1972 मध्ये त्यांनी आपल्या दूरदर्शनमधील कारकिर्दीला सुरवात केली तर 1974 साली अधिकृतपणे वृत्तनिवेदनाची धुरा हाती घेतली. त्यानंतर पुढे अनेक वर्ष सातत्याने ते वृत्तनिवेदक म्हणून यशस्वीपणे काम करत होते. देशभरातील आणि राज्यभरातील खूप महत्त्वाच्या बातम्या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं.