Stock Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ₹ 3.5 लाख कोटी बुडाले; ‘हे’ कारण आहे

Stock Market : बुधवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. बीएसई सेन्सेक्स इंट्राडेमध्ये जवळपास 1000 अंकांनी घसरला. अखेर निर्देशांक 676 अंकांनी घसरून 65,782 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 207 अंकांनी घसरला आणि 19,526 वर बंद झाला. आज बाजारात चौफेर विक्री झाली. यामध्ये ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते.

बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 3.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ते 303.24 लाख कोटी रुपये झाले आहे, जे काल 306.80 लाख कोटी रुपये होते. तत्पूर्वी, बीएसई सेन्सेक्स 68 अंकांनी घसरून 66,459 वर बंद झाला.

बाजारातील प्रचंड घसरणीचे कारण

1) अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई बाजारात जोरदार विक्री
2) डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण
3) हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार विक्री