राज्यसभेची निवडणूक जिंकल्यावर मुंबईत पार्टी करु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA ) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत.यातच आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित करण्यात आलं आहे. सध्या एकत्रित राहा, राज्यसभेची निवडणूक जिंकल्यावर मुंबईत पार्टी करु असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी भक्कम असल्याचा विश्वास राज्यसभेची निवडणूक होणं ही विचित्र गोष्ट, आतापर्यंतची परंपरा भाजपने मोडली. महाराष्ट्रात षडयंत्र रचलं जातयं, त्याला बळी पडू नका. आपण या राज्यात पाय रोवून उभं राहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले.