छत्रपती संभाजीराजेंना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar On Sambhaji Raje Death: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा झाली होती. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांच्या हत्येबद्दल मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली होती, तसेच त्यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद छिडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे माध्यामांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली, जयचंद मुळे गेले असा इतिहास आहे. तसेच औरंगजेबने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोचवली. संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली, आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू-मुस्लिम, जैन-हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.