गळा चिरला, रक्त प्यायला; पत्नीच्या अफेयरबद्दल समजल्यानंतर पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा

Karnataka Crime News : लग्नानंतर पतीचं दुसऱ्या स्त्रीसोबत अफेयर किंवा पत्नीचं दुसऱ्या पुरुषासोबत अफेयर असल्याच्या बऱ्याचशा घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. कर्नाटकातील चिकबल्लापूर येथील एका जोडप्यातही तिसरी व्यक्ती आली. ज्यानंतर पतीने त्या तिसऱ्या व्यक्तीला अशी शिक्षा दिली, जी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल.

मंड्यामपेट येथील व्यापारी विजय (३२) आणि मारेश (३०) हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. विजय गावोगाव जाऊन वस्तू विकायचा. यासाठी तो मारेशची टाटा एसी गाडी भाड्याने नेत असे. यादरम्यान मारेश आणि विजयच्या पत्नीची मैत्री झाली आणि दोघांमध्ये फोनवर बोलणे आणि चॅटिंगदेखील सुरू झाले. यासंदर्भात विजयने पत्नीसमोर नाराजीही व्यक्त केली होती.

नाराज विजयने यासंदर्भात आपला चुलत भाऊ असलेल्या जॉन बाबूसोबत चर्चा केली आणि मरेशचे वाहन घेण्यासंदर्भात प्लॅनिंग केली. यानंतर जेव्हा मरेश आपले वाहन घेऊन पोहोचला, तेव्हा विजय आणि बाबू मरेशला टमाटे दिखविण्यासाठी बाईकवर घेऊन गेले. मात्र, शेतात जाण्याऐवजी त्यांनी मरेशला निर्जनस्थळी नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी म्हटले आहे की, विजयने मरेशवर एका छोट्या चाकूने हल्ला केला. त्याचा गळा कापला आणि गळ्यातून वाहणारे रक्त प्यायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्याने बाबूला या घटनेचा व्हिडिओही शूट करायला सांगितले. यानंतर त्याने हा व्हिडिओ शेअरही केला. घटनेनंतर आरोपी मरेशला मेलेले समजून पळून गेले होते. यानंतर, काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी मरेशला रुग्णालयात दाखल केले.