Prakash Ambedkar | तुम्ही यापुढे भाजपाबरोबर जाणार नाहीत असे लिहून द्या,आंबेडकरांची ठाकरे अन् पवारांकडे मागणी

Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे लोकसभा जागावाटपावरुन महाविकास आघाडीशी खूश नाहीत. त्यांना अद्यापही महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत समाधानी उत्तर मिळालेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे ते भाजप सोबत जाणार नाहीत याची हमी मागितली असल्याचे समजत आहे.

वंचित भाजपाची बी टीम आहे का? असे आरोप नेहमी होत असतात. याबद्दल प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही या प्रश्नावर कुणाला उत्तर देण्यासाठी मोकळे नाही. ज्यांनी भाजपाबरोबर याआधी सत्ता स्थापन केलेली आहे. त्यांनी आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे दाखवू नये. आता ते धुतल्या तांदळेसारखे झाले आहेत, म्हणूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे की, तुम्ही यापुढे भाजपा बरोबर जाणार नाहीत, असे मतदारांना लिहून द्या. जर मतदारांना असे लेखी उत्तर दिले, तर मतदार पाठिंबा देईल. अन्यथा मतदारांना जो अर्थ काढायचा तो ते काढतील, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा