Sudha Murty | सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती; राष्ट्रपतींनी केलं नॉमिनेटेड

Sudha Murty Became MP | इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) यांना राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या X हँडलवरून ही माहिती दिली आहे. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत.

पंतप्रधानांनी X वर लिहिले, “मला आनंद आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा कृष्णमूर्ती यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या ‘महिला शक्ती’चा एक सशक्त पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्य आणि क्षमतांचे उदाहरण देते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा