Prakash Ambedkar | “युती झाली तर युतीत नाहीतर आपणच लढायचं आहे”, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

Prakash Ambedkar | ‘अबकी बार, ४०० पार’चा नारा देत भाजपने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. या ४०० पैकी ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. या ४८ जागा कमी करण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) म्हणाले की, ४०० पैकी ४८ जागा कमी झाल्यानंतर ३५२ जागा राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया. उद्या युती होईल की नाही हे डोक्यातून काढून टाका. झाली तर फार चांगली आणि नाही झाली तरी आपल्याला लढायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. जेवढ्या ताकदीने आपण उतरू. तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष, समुह जो भाजपाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युती झाली तर युतीत अन् नाही झाली तरी आपणच लढणार असंही त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा