भुजबळांना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हटल्याचा मनस्ताप -Sambhaji Raje Chhatrapati

Chhagan Bhujbal speech in jalana : राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर जहरी टीका केली आहे. यानंतर आता स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.

मी आजपर्यंत छगन भुजबळ यांना फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचारांचा वारसदार समजत होतो. मी भुजबळ यांच्या घरी जाऊन त्यांची प्रशंसा केली होती. मात्र त्यांचे शुक्रवारचे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी जी पातळी गाठली आहे. त्यामुळे त्यांना मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हटल्याचा मनस्ताप होत आहे, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.

ओबीसी कोटय़ातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात एल्गार सभेमध्ये भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. तसेच मराठा समाजाबद्दल अत्यंत हीन भाषा वापरत टिप्पणी केली. भुजबळ यांना मी समक्ष भेटल्यानंतर याबाबत जाब विचारणार आहे. मी त्यांना यापूर्वी भेटल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार असा गौरव केला होता. मात्र शुक्रवारचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर मला मनस्ताप झाला आणि त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा भुजबळ यांनी केली आहे. असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-