कसब्यात भाजपचा पराभव आमच्यामुळे झाला याची खंत जरूर आहे… पण पश्चाताप नाही – दवे

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल जाहीर झाला असून कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) तब्बल भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह काँग्रेसने कसब्यातील भाजपाची २८ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. या निवडणुकीत हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) आणि कलाकार अभिजित बिचुकले यांचीही फार चर्चा झाली मात्र या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना 47 तर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना अवघी 296 मते पडली आहेत.

या निकालावर भाष्य करताना डिपॉझिट जप्त झालेले आनंद दवे यांनी या निकालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, कसब्यात भाजपचा पराभव आमच्यामुळे झाला याची खंत जरूर आहे…पण पश्चाताप नाही. कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजप च्या विरोधात मतदान केल आहे.

मागील वेळेस या प्रभागात मुक्ता ताईंना 20000 च मताधिक्य मिळाले होते… या वेळेस भाजप येथून 1400 ने मागे पडले. बेगडी हिंदुत्व च्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारण आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरण याचा राग आमच्या मुळे व्यक्त झाला असा दावा दवे यांनी केला आहे. भ्रष्ट, जातीय, हिंदू द्वेष्टा राष्ट्रवादी पक्ष जर पहाटे शपथ विधी साठी तुम्हाला चालत असेल तर आम्हाला का नाही ?काँग्रेस च्या तांबे यांना तुम्ही निवडून आणत असाल तर मग आम्ही धंगेकर यांना आणलं तर काय बिघडल ? हे आमचे प्रश्न मतदारांना पटल्याच आम्हाला जाणवत आहे.

आझाद मराठीशी बोलताना दवे म्हणाले, चिंचवडमध्ये आंम्ही अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा दिला होता. यापुढील महानगरपालिका, विधानसभा यासह लोकसभेच्या देखील निवडणुका आम्ही लढवण्याचा विचार करत आहोत. यापुढेही हा लढा सुरूच राहील असं दवे यांनी म्हटले आहे.