प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचे प्रायव्हेट फोटो लीक, बंद खोलीत रोमँटिक होताना दिसले कपल

Priyanka Chopra-Nick Jonas- बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopda) सध्या तिच्या ‘सिटाडेल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राचे नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनास (Nick Jonas) किस करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या या खाजगी फोटोंनी सोशल मीडियावर तुफान आणले आहे.

प्रियांका-निकचे प्रायव्हेट फोटो लीक 
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे काही खाजगी फोटो जे सोशल मीडियावर लीक झाले (Priyanka Chopra-Nick Jonas Private Photo Leaked) आहेत. हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये निक जोनास आणि प्रियांका चोप्रा रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनासला किस करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या या कृतीने चाहते भारावून गेले आहेत.

दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघांच्या पोटी एक सुंदर मुलगी झाली असून तिचे नाव मालती मॅरी जोनास असे आहे.