बालपणीच्या मैत्रीचे प्रेमात असे रूपांतर झाले, राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

Jos Buttler’s Love Story: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. जोस बटलरच्या पत्नीचे(Jos Buttler Wife) नाव लुईस आहे. लुईस आणि जोस लहानपणापासूनच खूप जवळचे मित्र आहेत. हे दोघे एकेकाळी खूप चांगले मित्र होते. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

जोस आणि लुईसची प्रेमकहाणी शाळेच्या काळापासून सुरू झाली. दोघेही वयाच्या 14व्या वर्षापासून खूप चांगले मित्र होते. मैत्री इतकी घट्ट होती की, तेव्हापासून जोस लुईसला ‘बायको’ म्हणायचा. जोस आणि लुईसची ही मैत्री लवकरच नात्यात बदलली. जेव्हा या दोघांनी नवीन नात्यात प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकले नाहीत. कारण दोघांनीही आपापल्या करिअरला प्राधान्य देण्याचे ठरवले होते.

एकीकडे लुईसने कारकीर्द घडवली आणि दुसरीकडे बटलरने इंग्लंड क्रिकेट संघात आपली जागा पक्की केली, त्यानंतर दोघांनी एकमेकांना अधिक वेळ देण्यास सुरुवात केली.दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर जोस बटलरने 21 ऑक्टोबर 2917 रोजी लुईसशी लग्न केले. एप्रिल 2019 मध्ये या जोडप्याला पहिल्या मुलीचा जन्म झाला. तर दुसऱ्या मुलीचा जन्म सप्टेंबर 2021 मध्ये झाला.

जोस आणि लुईस यांच्यात उत्तम केमिस्ट्री आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. जोस बटलरची पत्नी लुईस बटलर एक व्यावसायिक पिलेट्स ट्रेनर आहे. अगदी लहान वयातच त्यांनी करिअरला सुरुवात केली. Pilates हा एक प्रकारचा जटिल व्यायाम आहे जो मन आणि संपूर्ण शरीराला आतून आणि बाहेरून मजबूत आणि सक्रिय ठेवतो. लुईस हे LBPilates चे संस्थापक आहेत आणि Pilates शिकवतात.