Pune crime News : सिंहगड रोड परिसरात गोळीबाराने खळबळ; एक जखमी

Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.(Crime incidents are increasing in Pune from last few days.) एका बाजूला कोयता घेवून दहशत माजवणारी टोळी (Koyata gang) पोलिसांची डोकेदुखी बनली असताना सिंहगड रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सनसिटी रोडवर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संतोष पवार, देवा राठोड व रमेश राठोड यांच्यासह अन्य काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील योगीराज ऑटो सेंटरमध्ये चर्चा करीत होते. यातील देवा राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर संतोष पवार यांच्याबद्दल काहीतरी लिहिले होते. यावरून संतोष पवार व देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली.

या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडल्याने संतोष पवार यांनी कमरेला असणारी पिस्तूल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.