पुण्यातील सराईत गुन्हेगार शरद मोहोळवर भरदिवसा गोळीबार, रुग्णालयात उपचार सुरू

Sharad Mohol :-  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथे भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. कोथरुडमधील सुतारदरा भागात हा गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे. शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्याची माहिती आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, कोथरुड भागात दहशत असलेला शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत मोहोळ गंभीर जखमी झाला. हल्लेखोर तेथून पसार झाले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद मोहोळची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात