पुणे : मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची पाठ फिरताच शहर मनसेमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पक्षाच्या कोणत्याही बैठकीला का बोलाविले जात नाही, अशी विचारणा झाल्याने शिवाजीनगर विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. वादविवाद टोकाला पोहोचल्याने झटापटीचा प्रसंगही घडला.

शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे (Ranjit Shirole) आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश वीटकर (Shailesh Vitkar) यांच्यात मनसे कार्यालयात झाली असं सांगण्यात येत आहे.रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असुन कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी बैठकीत विचारला. यानंतर संतापलेले रणजित शिरोळे हे अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.

पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यांसमोर हा वाद झाला. अयोध्या दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हा वाद झाला. या प्रकारामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.