Acharya Pramod Krishanam | ‘प्रियंका आणि राहुल गांधी यांनी आता पाकिस्तानातील रावळपिंडीतून निवडणूक लढवावी’ 

Acharya Pramod Krishanam | काँग्रेसचे माजी नेते आणि कल्की धाम पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वर्णन जिना यांचा जाहीरनामा असे केले आणि काँग्रेसचे काय झाले हे त्यांना माहीत नाही, ही महात्मा गांधींची काँग्रेस आहे असे वाटत नाही, असे सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) म्हणाले की, काँग्रेसचा जाहीरनामा बघितल्यावर असे दिसते की ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही, तर मोहम्मद अली जिना यांची काँग्रेस आहे.काँग्रेसचे काय झाले ते मला माहीत नाही, ना धोरण शिल्लक राहिले आहे… ना हेतू शिल्लक आहेत… ना कोणी नेता शिल्लक आहे. हे या देशाचे सर्वात दुर्दैवी आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर तिखट प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी आता रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, असे सांगितले.

आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishanam) यांच्या पक्षविरोधी वक्तव्यामुळे काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यानंतर ते सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसच्या अपयशासाठी त्यांनी राहुल गांधींना जबाबदार धरले आणि काँग्रेस वारंवार प्रभू रामाचा अपमान करत असून याचे परिणाम त्यांना भोगावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला