‘राज्य महिला आयोग एकच महिना माझ्या ताब्यात द्या, कायदा काय असतो हे दाखवून देईन’

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाची वाटचाल’ या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात (Balgandharva Hall) स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

यावरून राज्य महिला आयोग (State Women’s Commission) देखील सक्रीय झाला असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना (Pune Police) देण्यात आले आहेत. असे ट्विट (Tweet) राज्य महिला आयोगाने केले आहे.

यावरून आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी राज्य महिला आयोगाला टोमणा मारला आहे. देसाई म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. असा निशाणा साधत त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कामावर टीका केली आहे.

फक्त एक महिन्यासाठी महिला आयोगाचं अध्यक्षपद माझ्याकडे द्या कायदा काय असतो मी दाखवून देते असं देखील त्या म्हणाल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम कार्यक्रमांचं उद्घघाटन करणं आणि फित कापत बसणं एवढंच नाही. त्या निर्णय घेऊ शकतात. मात्र रूपाली चाकणकर या तसं काहीही करताना दिसत नाहीत. पक्षातल्या कुणावर काही गुन्हा दाखल झाला की कारवाई करायची. मात्र विरोधी पक्षातलं काही असेल तर फारसं लक्ष द्यायचं नाही असं काम होत नसतं. शरद पवारांना मी विनंती करेन की फक्त एक महिना माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या कायदा काय असतो? सगळ्या गोष्टींमध्ये समानता कशी आणायची? स्त्रियांना त्यांचा हक्क कसा मिळवून द्यायचा हे मी दाखवून देईन.असं त्या म्हणाल्या.