Pune Loksabha | वसंत मोरे यांना काँग्रेसचा बडा नेता ऑफर घेऊन भेटीला, कोणता निर्णय घेणार?

Vasant More | मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक (Pune Loksabha) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र मनसेकडून त्यांना उमेदवारी मिळवण्याच्या शक्यता फार कमी होत्या. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resigns) तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान वसंत मोरे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल? ते कुठल्या पक्षासोबत जातील या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. सध्या भाजपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे.

अशातच आपल्याला काँग्रेसकडीन ऑफर (Pune Loksabha) मिळाल्याची स्वत: वसंत मोरे यांनी माहिती दिली. “काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता,” असं ते म्हणाले आहेत. शिवाय मोहन जोशी (Mohan Joshi) काँग्रेसची ऑफर घेऊन वसंत मोरे यांच्या भेटीलाही गेले आहेत. वसंत मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल अशी भूमिका आपण माजी आमदार मोहन जोशी यांनी मांडली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य