केसरीवाड्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात रंगले नाराजीनाट्य; धंगेकरांची डोकेदुखी कायम 

Ravindra Dhangekar | अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) काँग्रेस कडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये असणाऱ्या इतर इच्छुकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. उमेदवारी जाहीर होऊन एवढे दिवस झाले तरीही शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये असणारा अंतर्गत कलह सुरूच असल्याचे दिसत आहे.

पुणे कॉंग्रेस गटबाजीमुळे अत्यंत त्रस्त आहे हे सर्वश्रुत आहे. काल धंगेकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी केसरीवाड्यामध्ये मेळावा पार पडली. यावेळी देखील हा वाद कायम राहिल्याने धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी वाढताना दिसत आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार,  मोदींना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडी काम करीत आहे. त्याच मोदींना ‘शांतीदूत’ म्हणणाऱ्या आणि पुरस्कार देणाऱ्यांसोबत आम्ही व्यासपीठावर कसे बसणार, असा सवाल करून काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याने कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

आघाडीचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक केसरीवाड्यात पार पडली. अनेक महत्वाचे नेते या बैठकीला हजर होते मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच हे नाट्य घडले. ‘ज्यांनी मोदींना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्या शेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही,’ असे सांगून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला. ‘मोदींना शांतीदूत म्हणणारे या व्यासपीठावर असतील, तर आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगायचे, काँग्रेसचा झेंडाही हाती न घेणारे काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करतील का,’ असा सवाल करून हा पदाधिकारी थेट बाहेर पडल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत