नववधूवर काळाचा घाला; तरीही तिने ४ जणांचे वाचवले प्राण

मुंबई : एका नवविवाहित दाम्पत्यासह विवाह अलीकडेच धुमधडाक्यात पार पडला. दोन्ही कुटुंबीय सध्या आनंदाच्या वातावरणात जीवन जगत होते. परंतु काही क्षणातच काळाने या दोन्ही कुटुंबीयांना घाला घातला. नवविवाहित दाम्पत्याने आपली लग्नाची रेशीम गाठ घट्ट बांधल्यानंतर त्यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली. सगळे जण या नवविवाहित जोडप्याला भरून भरपूर आशीर्वाद देत असताना नववधू स्टेजवरून खाली कोसळली(A Bride Falling Down From Stage) आणि नव्या संसाराचा सुरुवात करताच वधू मृत्यूमुखी पडली. परंतु मृत्यूनंतर ही तिने चार लोकांचे प्राण वाचविले आहेत. ज्याचं कौतुक लोकांनाकडून केलं जात आहे.

कर्नाटकातील कोडीचेरयू येथे राहणारी २६ वर्षीय चैत्रा के. आर या तरूणीचं लग्न नुकतच पार पडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीला अनेक नातेवाईक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमले. त्यावेळी चैत्रा ही स्टेजवर फोटो शूट करत असताना अचानक खाली पडली. तिच्या खाली पडल्यानंतर तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागला. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिला आता वाचवणं शक्य नाही, असं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. आपली मुलगी या संकंटातून वाचू तर शकणार नाही. परंतु इतरांना ती जीवनदान नक्कीच देऊ शकेल. हा विचार तिच्या कुटुंबाच्या मनात आला आणि लगेचच तिच्या आईवडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी दोन किडन्या, हॉर्ट व्हाल्व आणि दोन्ही डोळ्यांचे पडदे हे दान करण्यात आले. नववधूच्या आईवडिलांनी दाखवलेल्या या कार्याला कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी स्वतः सलाम केले आहे. तसेच तिच्या मृत्यूबद्दल दु:खही व्यक्त केले.

२६ वर्षीय चित्रा ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. बंगळुरू मधून एमएस्सी पुर्ण झाल्यानंतर तिने बीएड करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ती एका महाविद्यालयात शाळेतील मुलांना शिकवत देखील होती. तिला खंर तर प्राध्यापक होऊन शिक्षण क्षेत्रात करिअर करायचंय होतं. परंतु काळाने तिच्यावर घात केला. त्यानंतर आई वडिलांनी अवयव दान करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचं आता सगळ्या स्तरातून कौतुक केलं जातं आहे.