सोमय्यांनी १५ कोटी कोणत्या अधिकाऱ्याला दिले?, राऊतांचे थेट ईडीला आव्हान

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या हे संजय राऊत यांच्यावर वारंवार आरोप करत आहे तर संजय राऊत यांनी देखील काल शिवसेना भवनात किरीट सोमय्यांनावर निशाणा साधला. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना भाजपचा पाठिंबा नसल्याचे सुचित केले. तसेच त्यांच्यावर १०० कोटी घोटाळा केला असल्याचाही आरोप केला.

भाजपचे साडेतीन नेते लवकरात लवकर तुरूंगात जातील हे तुम्हाला मी या अगोदर सांगितले आहे. परंतु शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत मी त्यांची नावे उघड केली नाहीत. ते जसे जसे तुरुंगात जाणार तसे त्यांची नावे तुम्ही मोजत जा. बाप बेटे नक्की जाणार. इडीच्या नावाने धमक्या, खंडण्या हे जे काही चालले आहे, त्याचा लवकरच भांडाफोड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्यांना वर निशाणा साधताना म्हणाले की, १९ बंगले त्यांनी अजूनही दाखवले नाही. मुंबईमधील बिल्डर, व्यापारी यांना इडीच्या माध्यमातून धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी १०० कोटी रुपये गोळा केले आहेत. त्यामधील किती टक्के इडीकडे गेला आहे. ते किरीट सोमय्या हे बाहेर सांगत असतो. तसेच किरीट सोमय्यांनी इडीच्या अधिकाऱ्यांनाही पैसे दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इडीच्या धमकीने सुजित नावाचा १०० कोटी रुपयांचा फ्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी मातीमोल भावामध्ये आपल्या नावावर करून घेतला आहे. यातील १५ कोटी रुपये इडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला दिले आहेत. ते इडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावे, नाही तर मी त्यांचं नाव घेईन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, कोण आहे किरीट सोमय्या ? मी जे बोलतो आहे एक जबाबदार माणूस आहे. भाजपने सांगावं की किरीट सोमय्या हा आमचा जबाबदार माणूस आहे. तसेच जे काही आरोप करतो आहे. त्या आरोपाशी भाजप सहमत आहे. शिवसेना नेते अर्जून खोतकर, आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांना ईडीकडून त्रास देण्यात आला. तसेच अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपने करावा. अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.