Rahul Gandhi | कुत्र्यानं न खाल्लेलं बिस्कीट काँग्रेस कार्यकर्त्याला दिलं? राहुल गांधींची कृती वादात 

नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी विविध प्रयोग करत असतात याबद्दलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात यातच आता यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे ते सध्या टीकेचे धनी बनत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओची  तुफान चर्चा होत आहे.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेदरम्यान कुत्र्याला बिस्कीट खाऊ घातलं. कुत्र्याने त्या बिस्कीटाचा वास घेतला पण ते खाल्लं नाही. त्याच वेळी काही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींना भेटण्यासाठी आले. त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली, तेव्हा जे बिस्कीट कुत्र्याने खाल्लं नाही तेच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातावर ठेवलं आहे. सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या या कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

भाजप नेते अमित मालवीय (Amit Malviya) यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि जेव्हा कुत्र्याने खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तेच बिस्कीट आपल्या कार्यकर्त्यांना खायला दिलं आहे. एखाद्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यांसारखे वागवत असतील, तर असा पक्ष नामशेष होणे स्वाभाविक आहे. असे मालवीय यांनी म्हटले आहे. आझाद मराठी या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही. काहींनी हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचीही शंका व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान