जमीन नावावर करण्यासाठी जन्मदात्या वडिलांचा छळ करीत केले आत्महत्येस प्रवृत्त , मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

दौंड – जमीन नावावर करण्यासाठी मुलाने मावस भाऊ, चुलता यांच्या मदतीने वडिलांवर वारंवार दबाव आणत मानसिक छळ (Mental torture) केला .या छळास कंटाळून वडिलांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी तिघांवर पाटस पोलीस चौकीत ( Patas police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (Keshav Wabele) यांनी दिली.

प्रकाश गणपत दिवेकर ( रा. वरवंड ता. दौंड जि. पुणे ) मच्छींद्र नारायण शितोळे (रा. रोटी ता. दौंड जि पुणे ) व तुकाराम दिवेकर ( रा. वरवंड ता.दौंड जि पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील गणपत भुंजग दिवेकर यांच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतः च्या नावावर करण्यासाठी मुलगा प्रकाश याने नोव्हेंबर २०१५ मध्ये पावणेचार एकर जमीन जबरदस्तीने नावावर करून घेतली व त्यानंतर राहिलेली २.७५ एकर शेतजमीन आणि ताराबाई यांच्या नावावर असलेली १.७५ शेतजमीन नावावर करून घेण्यासाठी वडिलांवर मानसीक दबाव आणला व त्यांना जबरदस्तीने बारामती येथुन वरवंड येथे आणुन ठेवले. जमीन नावावर करण्यासाठी वारंवार दबाव आणुन मानसिक छळ केला. त्यामुळे गणपत दिवेकर यांनी मानसिक दबावाला व छळवणुकीला कंटाळुन १० जानेवारी २०२२ रोजी शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

याबाबत ताराबाई गणपत दिवेकर यांनी पाटस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे . सदर फिर्यादीवरून प्रकाश गणपत दिवेकर , मच्छींद्र नारायण शितोळे व तुकाराम दिवेकर या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली .