Narendra Modi | मोदींच्या प्रचार सभेला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाने भाजप हादरला – कॉंग्रेस 

Narendra Modi मडगाव (Madgaon) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रचार सभेला लोकांच्या अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील सर्वाधिक भ्रष्ट भाजप सरकार (BJP Govt) हैराण झाले असून त्यामुळे सरकारने गर्दी जमवण्याच्या बेतात विविध वाहिन्या सक्रिय केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी केला आहे.

उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाने सरकारी खर्चावर पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी गर्दी जमवण्याबाबत सर्वाधिक भ्रष्ट भाजप सरकारची धडपड उघड झाली आहे. विद्यार्थ्यांना राजकीय सभेत सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही सदर परिपत्रकाचा निषेध करतो. भाजपने बेशरमीची हद्द ओलांडली आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोमतकीयांकडून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. खास सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन डॉ. प्रमोद सावंत यांनी पीडब्ल्यूडीच्या नवनियुक्त तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंत्यांना पालकांसह भाजपच्या प्रचार सभेस येण्यास आणि त्यांची नियुक्ती पत्रे गोळा करण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोट अमित पाटकर यांनी केला.

तथाकथित भारत विकास रॅलीच्या प्रचार साहित्यात दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांचा समावेश नाही. हा दक्षिण गोव्यातील जनतेचा अपमान आहे. 2019 मध्ये भाजपला मत न दिल्याने दक्षिण गोव्यातील जनतेचा अपमान करण्याची संधी भाजपने जाणूनबुजून घेतली, असा दावा अमित पाटकर यांनी केला. मोदींनी गोव्यात आणखी दहा सभा घेतल्या तरी आगामी निवडणुकीत काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान