Sunetra Pawar | “महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल”, सुनेत्रा पवारांंचा विश्वास

Sunetra Pawar: महायुतीच्या बारामती लोकसभेच्या अधिकृत (Baramati Loksabha) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज भोर दौऱ्यावर आल्या आहेत. उमेदवारी घोषीत झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. अशातच आज त्यांनी भोर मतदारसंघातील विविध ठिकाणी जाऊन नेत्यांच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यातच भोर येथील एका विद्यार्थ्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या घरी जाऊन सुनेत्रा पवार यांनी कुटुंबियाचं सात्वंन देखील केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुनेत्रा पवारांनी आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर शहर उपाध्यक्ष विशाल तुंगतकर यांच्या धुमाळनगर भोर येथील निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी तुंगतकर कुटुंबियांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवथरे, भोर शहराध्यक्ष केदार देशपांडे, युवकचे शहराध्यक्ष कुणाल धुमाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भोर येथील श्रवण नितीन इंजरकर याचे नुकतेच अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. विशाल हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. ७० सदस्यांच्या भल्या मोठ्या एकत्रित कुटुंबातील सर्वांचा लाडका असणाऱ्या श्रवणच्या या दुर्दैवी मृत्यूने इंजरकर (कुंभार) कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगात आज इंजरकर कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

दरम्यान, त्याआधी सुनेत्रा पवार यांनी आज भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन मांडके यांच्या भोर येथील निवासस्थानीही भेट दिली. यावेळी युवा मोर्चाचे पंकज खुर्द, भाजपाच्या जिल्हा प्रतिनिधी स्वाती गांधी, मच्छीमार आघाडीचे सुरेश कांबळे यांचीही भेट झाली. या सर्वांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा