राज ठाकरेची अवस्था, पिंजरा सिनेमा मधील मास्तर सारखी – छगन भुजबळ

कोल्हापूर – राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर काय बोलायचं… आज वेगळंच सुरू आहे. जुन्या काळात व्ही शांताराम (V. Shantaram) यांचा एक पिंजरा (Pinjra) नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमात मास्तर तमाशा विरोधात होते मात्र त्या सिनेमातील तमाशात काय झाले मास्तर कमळीच्या मागे लागले आणि तमाशात तुणतुणे वाजवायला लागले अशी जोरदार टिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.

कानाकोपऱ्यात लोकांना अन्न पुरवण्याचे काम महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकारने केले. समतेचा संदेश देणाऱ्या कोल्हापूरात चिखल उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी सरकारवर कोल्हापूरवासियांनी विश्वास ठेवला आणि पोटनिवडणूकीत विजय मिळवून दिला त्याबद्दल अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील उद्योग संपवण्याचा प्रयत्न होतोय. आर्थिक स्थिती मजबूत करणार्‍या महाराष्ट्राला मारु नका. सध्या भोंग्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ सुरू आहे. लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय. भोंगे पेट्रोल पंपावर लावा ना आणि सांगा किती पेट्रोल-डिझेलचे दर वाढले (Petrol Diesel Price Hiking) आहेत ते. यावर बोलायला लागलो की भाजपच्या नेत्यांनी सांगितले की ईडी (ED) आलीच. आम्ही घाबरणार नाही. हम बोलते रहेंगे… असा स्पष्ट इशाराही छगन भुजबळ यांनी दिला.