‘नसरुल्लाह माझा कायदेशीर पती…’, अंजू बनली फातिमा; निकाहचा प्रतिज्ञापत्र व्हायरल

Indian Woman in Pakistan: भारत सोडून प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजू थॉमसचे (Anju In Pakistan) संपूर्ण सत्य समोर आले आहे. अंजूने पाकिस्तानात आपला धर्म बदलला आहे. अंजूपासून ती फातिमा झाली आहे. तिने तिचा कथित मित्र नसरुल्लाहशी निकाह केला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या अपर दीर जिल्ह्याच्या न्यायालयात त्यांनी कायेदशीर निकाह केल्याच बोललं जातय. सोशल मीडियावर दोघांच्या निकाहनाम्याच शपथपत्र व्हायरल होत आहे.

“फातिमा, दुख्तर अंजू पुत्री जी प्रसाद, फ्लॅट नंबर 704, टावर एस अलवर टेरा एलिगेंस भारत. माझं मागच नाव अंजू होतं. माझा ख्रिस्ती धर्माशी संबंध होता. मी माझ्या मर्जीने इस्लाम कबूल केलाय. यात कोणतीही जबरदस्ती झालेली नाही. मला नसरुल्लाह पसंत आहे. त्यासाठी मी माझा देश भारत सोडून पाकिस्तानला आली. साक्षीदारांमसोर मर्जीने नसरुल्लाह सोबत निकाह केलाय. 10 तोळे सोन आणि शरीयतने निकाह केलाय. नसरुल्लाह माझा कायदेशीर पती आहे. हे माझं वक्तव्य एकदम योग्य आहे. यात काही लपवलेलं नाहीय” असं व्हायरल झालेल्या अंजूच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे.