संजय राठोडांनी पूजा चव्हाणवर अत्याचार केले, आमच्याकडे त्याची ५६ मिनिटांची सीडी :  गायकवाड

Mumbai –  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. यावरूनच  संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी (Shiv sainik) राठोडांविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनी संजय राठोड यांचे पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणातील पुरावे समोर आणणार असल्याचं म्हटलंय.

या प्रकरणातील ५६ मिनिटांची एक सीडी (CD) माझ्याकडे असल्याचा दावा राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. या सीडीतून बंजारा समाजाची मुलीला संजय राठोड यांनी कसं मारलं हे उघड होईल, असाही दावा गायकवाड यांनी केलाय . पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणवर कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याचा पर्दाफाश करू.असं राजेंद्र गायकवाड म्हणाले.