सत्ता आल्यास महाजन पुन्हा मंत्री होणार; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण 

जळगाव  –  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजपमधील अनेकांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. कार्यकर्त्यांना देखील आपला नेता मंत्री व्हावा अशी इच्छा आहे. शिवसेनेचा फुटीर गट व भाजप (BJP) युतीचे सरकार आल्यास गिरीश महाजन (Girish Mahajan) पुन्हा मंत्री होतील  असा विश्वास व्यक्त केला जात आहे.महाजन यांच्या मंत्रीपदाची चर्चा तालुकाभर सुरु आहे.  मतदारसंघाला पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.