उदयपूरमधील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करा, कोणीही कायदा हातात घेऊ नये; ओवेसींचे शांततेचे आवाहन 

नवी दिल्ली –  राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल कन्हैया लाल (Kanhaiya Lal) या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही तयार करण्यात आला असून तो व्हायरल करण्यात आला आहे. कन्हैया लाल उदयपूरमधील भूतमहालजवळ सुप्रीम टेलर्स(Supreme Tailors near Bhootmahal)  नावाचे दुकान चालवत असे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच वाजता रियाझ अख्तारी (Riaz Akhtari) आणि गौस मोहम्मद (Gauss Mohamed) नावाचे आरोपी तलवार आणि चाकू घेऊन त्याच्या दुकानात पोहोचले आणि भरदिवसा त्यांचा गळा चिरला.

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, आमच्या सरकारने दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.  ओवेसी यांनी ट्विट केले की,मी राजस्थानच्या उदयपूरमधील (Udaipur) भीषण हत्येचा निषेध करतो. याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. आमच्या पक्षाची भूमिका या प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करण्याची आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आम्ही अशी मागणी करतो. राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. कायद्याचे राज्य राखले पाहिजे.असं ते म्हणाले.