राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादल राज्यप्रमुखपदी राजेंद्र लावंघरे, जालना युवक जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सरकटे यांची नियुक्ती

NCP- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादल राज्यप्रमुखपदी राजेंद्र लावंघरे आणि कार्याध्यक्षपदी शिवाजी बनकर यांची तर जालना युवक जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सरकटे यांची आज नियुक्ती करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

राजेंद्र लावंघरे, शिवाजी बनकर, ज्ञानेश्वर सरकटे हे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार विक्रम काळे, माजी आमदार कैलास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !