बाबर आझम आणि संघावर होणार FIR; पाकिस्तानी अभिनेत्रीची खुली धमकी, पण कारण काय?

IND vs PAK: आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पाकिस्तानला 228 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बाबर आझम (Babar Azam) आणि त्याच्या संपूर्ण संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) तर इतकी संतापली आहे की तिला बाबर आझमच्या संपूर्ण टीमला तुरुंगात पाठवायचे आहे. शिनवारीने बाबर आझम आणि त्याच्या टीमवर राग काढला आणि त्यांना धमकीही दिली आहे.

मी बाबर आझम आणि त्याच्या संघाविरुद्ध एफआयआर दाखल करणार आहे, कारण हे लोक नेहमीच क्रिकेट खेळण्याऐवजी आमच्या राष्ट्रीय भावनांशी खेळतात, अशा आशयाचे ट्वीट अभिनेत्री सेहर शिनवारी हिने केले आहे. तिच्या या ट्वीटवर क्रिकेटप्रेमी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !