राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केतकीला शिवागाळ करतायत मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? 

 पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
केतकी चितळेने  शरद पवार यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल (Viral) झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट (Repost) करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र (Conspiracy) आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता या वादामध्ये भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईंनी (Trupti Desai Bhumata Brigade) उडी घेतलीय. देसाईंनी केतकीचं समर्थन केलंय. केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेलं नाही असं सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केलीय. “केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) टाकली त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे ते नेमकं शरद पवारांबद्दलचं बोललं या या विषयावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही,” असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला विरोध करतायत, तिला ट्रोलिंग करतायत, तिचे आक्षेपार्ह फोटो टाकतायत, शिवागाळ करतायत मग त्या कारवाई (Action) का होत नाही ?,” असा प्रश्न तृप्ती देसाईंनी विचारलाय.