Sanjay Gaikwad | मी बंड केलेलं नाही, अर्जही मागे घेणार नाही

Sanjay Gaikwad  | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं ८ उमेदवारांची पहिली यादी काल संध्याकाळी जाहीर केली. त्यात ७ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलडाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. रामटेकमध्ये राजू पारवे यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे.

शिवसेनेनं उमेदवारांची नावं अधिकृतपणे जाहीर करण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी काल बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला; त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरला आहे.

आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतील, असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत. मात्र, आपण अर्ज मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. मी बंड केलेलं नाही, मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. 4 तारखेनंतर कळेल काय होतं, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून मी नामांकन दाखल केलं, तूर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. चार तारखेनंतर काय होतं ते कळेल, असंही ते म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल