“माझ्या जवळ येऊ नका, मी पवित्र आहे”; मक्का-मदीनाला जाऊन आल्यानंतर राखी सावंतने खडसावून सांगितलं

Rakhi Sawant Umrah: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) नुकताच उमराह केला असून आता ती मुंबईत परतली आहे. भारतात परतल्यानंतर आता मला राखी नाही तर पापराझी म्हणायचं, असं ती पापराझींना म्हणाली. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

फिल्मी ग्रान’ या पेजवरील राखीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. त्यावेळी पापाराझी तिचा फोटो काढण्यासाठी जातात. तेव्हा राखी भडकते आणि म्हणते, “कृपया दूर राहा… माझ्या जवळ येऊ नका. पुरुषांनी मला स्पर्श करू नका..मी मक्का-मदीनाला जाऊन आली आहे. त्यामुळे पुरुषांनी दूर राहावे. मला स्पर्श करू नये… मी पवित्र आहे”.