किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णाकडे पैसे नव्हते, ‘या’ महिला  मंत्र्याने सोन्याचे ब्रेसलेट दान केले 

तिरुवनंतपुरम – केरळच्या उच्च शिक्षण मंत्री (Minister of Higher Education of Kerala)आर बिंदू (R.Bindu)यांनी हृदयस्पर्शी काम केले आहे. त्यांनी आपले एक सोन्याचे ब्रेसलेट किडनीच्या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाला दान केले. या रुग्णाला प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता.मात्र आता मिळालेल्या या मदतीमुळे त्याची शस्त्रक्रिया यशस्वी होईल असं सांगितले जात आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मंत्री त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजलाकुडा भागात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय मदत समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या , जिथे त्यांना 27वर्षीय पीडित विवेक प्रभाकरची समस्या समजली.त्यांनी ताबडतोब आपल्या मनगटातून सोन्याचे ब्रेसलेट काढले आणि रुग्णाच्या उपचाराच्या खर्चात हातभार लावला आणि इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला.समितीच्या बैठकीत इरिंजलकुडाचे प्रतिनिधी म्हणून मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते.