Sherlyn Chopra And Adil Khan Durrani: जेव्हापासून राखी सावंतचा माजी पती आदिल खान दुर्रानी तुरुंगातून बाहेर आला, तेव्हापासून तो चर्चेत आहे. अलीकडेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राखीवर गंभीर आरोप केले होते. आता राखीच्या विरोधात वळताना तिच्या जिवलग मैत्रिणी देवश्री आणि शर्लिन चोप्रा आदिलच्या समर्थनार्थ उभ्या आहेत.
30 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. अशात या वादांमध्ये शर्लिन चोप्राने आदिल खान दुर्रानीच्या मनगटावर राखी बांधली. इन्स्टंट बॉलिवूडने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शर्लिनने सूट परिधान करून आदिलची आरती केली आणि नंतर कपाळावर तिलक लावल्याचे दिसून येते.
https://www.instagram.com/reel/CwlKEtqy-tn/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
राखी सावंतच्या अडचणी वाढणार! जिवलग मैत्रिणीनेच दाखल केली पोलिसात तक्रार, कारण काय
यानंतर अखेर शर्लिनने आदिलला राखी बांधली. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. शर्लिन आणि आदिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोघेही ट्रोलचे लक्ष्य बनले.
https://youtu.be/RCqFsZV8rAU?si=5UuOs6Ba4Cr-4WcP