INDIA आघाडीचे संयोजक बनायचे असल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार ?

Nitish Kumar: INDIAआघाडीच्या तिसऱ्या बैठकीत नितीशकुमार विरोधी आघाडीचे समन्वयक बनू शकतील का? पाटण्यापासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात हा प्रश्न चर्चेत आहे. 11 सदस्यांच्या समन्वय समितीबाबत या बैठकीत निर्णय होणार असल्याने हा प्रश्नही आहे.

जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीत सहभागी 5 नेत्यांनी संयोजकपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे, मात्र आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या विरोधामुळे याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नितीश कुमार यांना संयोजक बनवण्यास सहमती दर्शवली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उघडपणे नितीश कुमार यांना स्वतःहून सर्वोत्तम दावेदार म्हटले आहे.सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी हेही नितीश कुमारांच्या बाजूने आहेत. सीपीआयचे डी राजा यांनीही नितीश यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

नितीश कुमार होणार INDIAचे संयोजक? 5 पक्षांचा मिळाला पाठींबा?

आरजेडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांना नितीश कुमार यांना संयोजक बनवायचे आहे, मात्र नितीश यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून दिल्लीला जावे, अशी त्यांची मागणी आहे. आरजेडी नेत्यांचे म्हणणे आहे की, ऑगस्टमध्ये जेडीयू आणि आरजेडीची युती झाली तेव्हा करार झाला होता. याअंतर्गत नितीश दिल्लीला गेल्यावर तेजस्वीसाठी मुख्यमंत्र्याची खुर्ची सोडतील. या कथित डीलमुळे उपेंद्र कुशवाह यांनी नितीशची बाजू सोडली. संयोजकांसाठी नितीश यांच्या बाजूने वातावरण तयार झाले होते, मात्र लालूंच्या एका वक्तव्याने जेडीयूच्या अडचणी वाढल्या, असे जाणकारांचे म्हणणे आहे.