राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची टिका म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा होय; भाजपचे सणसणीत प्रत्युत्तर

Beed – महाविकास अघाडी 2019 मध्ये सत्तेवर येत्याच तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी बीड जिल्ह्यात केज गेवराई विधानसभा मतदार संघात विकास कामांना स्थगिती देवून 100 कोटीचा निधी कागल आणि बारामती मतदार संघात वळवल्याची आठवण भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यानी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांना करून दिली . एक बोट दुसऱ्या कडे दाखवतो तेंव्हा चार बोट आपल्या कडे असतात असा टोमणा त्यांनी लगावला त्यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेही त्यांनी म्हटले आहे

शिंदे फडणविस सरकारने महाविकास आघाडीच्या विशेष करून ग्रामविकास खात्याने मंजुर केलेल्या विकास कामाना स्थगिती दिल्या नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या पोटात गोळा उठणे साहजिकच म्हणावे लागेल . त्या पक्षाचे प्रवक्ते   महेश तपासे यांनी यावर टिका करताना स्थगिती सरकार आशी टिका केली मात्र तपासे यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतांना राम कुलकर्णी जोरदार हल्ला चढवत तपासेंनी अगोदर आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला . तुम्ही आम्हाला स्थगिती सरकार म्हणता तर मग तुम्ही 2019 मध्ये सतेवर येताच बीड जिल्ह्यात तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडेनी मंजुर केलेल्या 100 कोटीचा कामांना हसन मुश्रीम यांनी स्थगिती दिली . एढेच नाही तर केज आणि गेवराई विधानसभा मतदार संघ जे भाजपा कडे आहेत त्या दोन मतदार संघात राजकिय आकसापोटी मंजुर निधी पळवल्याची आठवण कुलकर्णी यांनी तपासे यांना करून दिली .

या प्रकरणात आमचे कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले तिथे न्याय मिळाला होता . तपासे यांची टिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून अगोदर स्वःताचे आत्मपरिक्षण करा असा सल्ला कुलकर्णी यांनी दिला . शिंदे फडणविस हे सरकार स्थगिती सरकार नसून विकास कामांना गति देणार सरकार हे विरोधकानी लक्षात घ्याव अस राम कुलकर्णी यांनी म्हटले