भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने कोसळल्याने खळबळ; सुखोई आणि मिराज विमान कोसळले

मुरैना :  मध्य प्रदेशातील मुरैना येथे शनिवारी भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने कोसळल्याने खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, मुरेना येथे सुखोई-३० आणि मिराज २००० हे लढाऊ विमान कोसळले. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले जेथे सराव सुरू होता. या अपघातात हवाई दलाचे दोन वैमानिक बचावले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) आदर्श कटियार यांनी सांगितले की, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  विमान एकमेकांवर आदळले की नाही हे देखील स्पष्ट झाले नाही, दोन पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले, परंतु तिसरा बेपत्ता आहे. (A Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा सरावात सहभागी असलेल्या ग्वाल्हेर एअरबेसवरून दोन्ही लढाऊ विमानांनी उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल प्रमुखांकडून अपघाताची माहिती घेतली आहे. संरक्षण मंत्रीही सीडीएसच्या संपर्कात आहेत.  शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.