चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधातला हा आक्रोश आहे; एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया 

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली आहे. यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक करण्यात आली आहे. तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकण्यात आल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात येत आहे. एसटीचे   शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे, त्याला  चोरांचे पुढारी शरद पवार जबाबदार आहेत, अशा तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनावेळी  एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधातला हा आक्रोश आहे, अशी तिखट प्रतिक्रिया या एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.