निळे डोळे, गोंडस हास्य; रणबीर-आलियाने पहिल्यांदाच दाखवला मुलगी राहाचा चेहरा

Raha Kapoor Face Reveal: अखेर प्रतीक्षा संपली…! रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी चाहत्यांना त्यांची छोटी राजकुमारी राहा कपूरची पहिली झलक दाखवली आहे. ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर या जोडप्याने आपल्या मुलीचा चेहरा उघड करून चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. कपूर घराण्याच्या नातवाला पाहून चाहते कमालीचे आनंदित झाले आहेत. राहाच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीचा चेहरा उघड केला
कपूर कुटुंबात आज ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचमध्ये रणबीर-आलियाने मुलगी राहासोबत पापाराझींसाठी पोज दिली. या जोडप्याने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा जगासमोर उघड केला आहे.

रणबीरने आपल्या लाडक्या मुलीला काखेत उचलून घेतले होते. राहाला पाहिल्यानंतर चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. राहाचा गोंडसपणा, तिचे मनमोहक स्मित आणि निळे डोळे यामुळे तिच्या चाहत्यांची ह्रदये जलद गतीने धडधडत आहेत. राहाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत.

राहा कपूर कुणावर गेली?
राहा पापा रणबीरबरोबर पावडर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसली. दोन वेण्या घालून ती खूप गोंडस दिसत आहे. राहाच्या वेण्यांमध्ये कार्टून क्लिप आहेत. लहान राहा गुलाबी आणि पांढर्‍या फ्रॉकसह लाल शूज परिधान करताना दिसली.

राहाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राहाचा बबली आणि क्यूट लूक पाहून एका चाहत्याने लिहिले – हे संपूर्ण कपूर कुटुंबाला गेले आहे. दुसर्‍याने लिहिले – राहा खूप सुंदर आहे. काही जण राहाला तिचे आजोबा ऋषी कपूर यांची कॉपी म्हणत आहेत, तर काहीजण म्हणतात की राहा तिचे वडील रणबीर कपूरसारखी दिसते.

आलिया भट्टने एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी या जोडप्याच्या घरी एका छोट्या पाहुणीचा जन्म झाला. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर ठेवले आहे. आलिया-रणबीरची मुलगी 1 वर्षाची झाली आहे. गेल्या महिन्यात राहाचा पहिला वाढदिवस कपूर घराण्यात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि आता अखेर राहाला पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध : अतुल भातखळकर

दु:खद! प्रसिद्ध कॉमेडियनने घेतला जगाचा निरोप, दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे गेला जीव

हार्दिक पांड्याच्या संघात पुनरागमनाचा सस्पेन्स संपला! ‘या’ मालिकेतून कमबॅक करणार