मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध : अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar Criticize Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार (Padmashree Award) सरकारला परत करण्याची घोषणा केली होती. “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे….” बजरंगने पंतप्रधानांना (PM Narendra Modi) लिहिलेल्या पत्रात ही घोषणा केली होती. त्यानंतर त्याचे मोदींच्या घरासमोरील फुटपाथवर पद्मश्री पुरस्कार ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले. यावरुन भाजपाने बजरंग पुनियावर हल्ला चढवला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बजरंग पुनियावर जोरदार टीका केली आहे. इतिहास याद रखेगा. पद्मश्री पुरस्कार फूटपाथवर ठेवणे हा समस्त भारतीयांचा, भारत सरकारचा व देशाचा अपमान आहे. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित. मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं.

इतकंच नाही तर “निवडणुका जवळ आल्या की अवॉर्ड वापसी गँग सक्रिय होते, हा २०१४ पासूनचा देशाला आलेला अनुभव आहे. ही गँग पुरस्कार तर परत करते मात्र पुरस्काराची रक्कम परत करते की नाही, हे जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे. सरकारी नोकऱ्या आणि निवासही परत करा”, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सीमा हैदरला कुणी ओळखतही नाही”, पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूने असे का म्हटले?

“आमची भांडणं फक्त मैदानात…”, विराटबाबत गौतम गंभीरच्या वक्तव्याने जिंकली मने

“ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे मोठे उपकार आहेत”, नितीन गडकरी यांचं मोठं विधान