प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष – योगी आदित्यनाथ 

जामनेर – प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाने देश आणि धर्मासाठी संघर्ष  केला असून हा समाज वीरांचा समाज असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी केले. ते अ. भा.हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 2023  च्या समारोप प्रसंगी बोलत होते.

गोद्री येथे 25 ते 30  जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता .  30 रोजी  कुंभाचा सहावा आणि अंतिम दिवस होता . सहा दिवसीय बंजारा कुंभात  १२ लाख भाविक सहभागी झाले. यावेळी धर्मसभेच्या व्यासपीठावर योग गुरु रामदेवबाबा ,मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज (श्री द्वारका  शक्ती पिठाचे) ,महामंडलेशवर जनार्धन स्वामी, बाबूसिंग महाराज, गोपाल चैतन्य महाराज, धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, भैय्याजी जोशी , आदी उपस्थित होते .

11.30 वाजता रामदेवबाबा यांचे गोद्री येथे आगमन झाले. तेथे पू .संत धोंडीराम बाबा व पू .आचार्य श्री चंद्रबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत पारंपरिक लोकगीतांनी झाले. यावेळी सुरेश महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी  श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज,श्री शारदा  शक्ती पिठ यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतात हिंदू धर्म टिकला तर राष्ट्रवाद टिकेल ,हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही. बंजारा समाजाच्या पूर्वजांनि हिंदू धर्मासाठी त्याग केला आहे, धर्म परिवर्तन करतांना त्यात कोणते दोष पाहिले आणि धर्मांतरित होताना त्या धर्मात कोणती वैशिष्ट्ये पाहिली याचा विचार करावा. देशात चार  मठ  हिंदू  धर्माच्या रक्षणासाठी आहेत  असे प्रतिपादन केले.
योगगुरू रामदेवबाबा यांनी आपल्या उपदेशात माता – पितामध्ये परमेश्वर बघा , सनातन धर्मात भेदभाव नाही. भेदभाव केला असता तर   इसाई एक पाऊलही भारतात टाकू शकले नसते. इस्लामने क्रूरतेने अनेकांना मुस्लिम बनविले. क्रूरतेने मुलींच्या शरीराचे अनेक तुकडे केले आहे. यांना अशा वर्तुणुकीची संधी पुन्हा देऊन नका. जे म्हणतात  इस्लाम महान आहे पण ज्यांनी  इस्लाम वाढविला त्यांचे वंश संपले. हिंदू धर्म विश्व् धर्म आहे. सनातन नित्य आहे  जे कधीही मिटणार नाही. जल , धरती व वायू आपला धर्म बदलू शकत नाही तर आपला धर्म कसा काय कुणी बदलू शकतो. इस्लामने केलेले पाप धुण्याची हि संधी आहे. गावातील एक व्यक्ती गरीब झाला तर गावकऱ्यांनी त्याला मदत करा. पातंजली च्या माध्यमातून ५ लाख लोकांना रोजगार मिळाला असून  आणखी ५ लाख लोकांना रोजगार देणार आहे . योग करा , समाजातून व्यसनाधीनता बाहेर काढा , राम , कृष्ण व शिवयाची आराधना करा . योग्य केल्याने आजार दूर जातील असे सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात  सर्व कामना पूर्ती ,सिद्धी प्राप्ती साठी कुंभ असतो भारत माता रक्षणासाठी बंजारा समाजाचे व्यापक कार्य आहे. भारतात जन्म घेणे दुर्लभ आणि त्यातच मनुष्य जन्माला येणे दुर्लभ आहे. सनातन धर्म मानवता कल्याण मार्ग प्रशस्त करतो. सनातन धर्म म्हणजे मानव धर्म . भारत जगातील ५ वि सर्वात मोठी अर्थ व्यवस्था राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नामांतर होऊन अमृत गार्डन झाले. ५०० वर्षांपासून परीक्षेत असलेलं राम मंदिर पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष आपलया गुलामगिरीची चिन्हे नष्ट करायची आहेत आणि आपल्या वारशाचा गौरव करायचा आहे. एक भारत श्रेष्ठ भारत वर  काम करायचे आहे. जाती भेद ,भाषा भेद आणि प्रांत भेद नको . बंजारा समाज आदी समाज आहे .

उत्तर प्रदेश धर्मातंरण करता येत नाही जर केले तर १०  वर्ष शिक्षा लागते. दंगे बंद झाले आहेत . दंगा केला तर चौकात फोटो लागतो , तीन दिवसांनी मालमत्ता सरकार जमा होते. गो हत्त्या होत नाही . जर झाली तर १० वर्षे शिक्षा लागते." भेदभाव करत नाही पण आस्थेशी खिलवाड शान होणार नाही. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित असल्याचे मार्गदर्शन केले . आभार प्रदर्शन रामेश्वर नाईक यांनी मानले

बंजारा समाज हा भूमिपुत्र समाज आहे. आठ राज्यातील बांधव कुम्भासाठी आले आहेत, युवक मोठ्या संख्यने जमले आहेत हि उर्जा आहे. मागील आठ वर्षापासून सोडवण्यासाठी काम सुईरू आहे. बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ५९३ कोटी रुपयांच्यान निधीला मान्यता दिली आहे असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री इर्क्नाथ जी शिंदे यनी केले, तर संपूर्ण भारतात असलेला हा समाज संस्कृती टिकवण्यासाठी बंजारा समाजचे मोठे योगदान आहे. या कुंभमेळ्यात धर्माविषयी मोठे चिंतन झाले असून ते राष्ट्रासाठी पूरक ठरेल. दिल्ली येथे लाखिशा बंजारा स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार असून पोहरागड चा विकास करू असे प्रतिपादन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी गोरमाटी भाषेत केली.